“तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक January 6, 2025 by akshay1137 Viral video: व्हिडिओमध्ये महिलांना साडीत अप्रतिम डान्स करताना पाहून यूजर्स थक्क झाले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे ladies group dance marathi video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये काही महिलांनी भन्नाट डान्स करुन सगळ्यांना घायाळ केलं आहे. व्हिडिओमध्ये महिलांना साडीत अप्रतिम डान्स करताना पाहून यूजर्स थक्क झाले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. या महिलांनी गाजलेला मराठी गाण्यावर “तुझ्या प्रितीत झाले खुळी, तुझ्या वाचून ना करमे मुळी, माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्नात तू तरी का रे सख्या दूर तू… डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सहा महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एका मैदानात त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ creation_dance_studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुझ्या प्रितीत झाले खुळी” तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच छान ताई” तर आणखी एका महिलेने “घर संसार सांभाळून आपली आवड जपणे फार महत्त्वाचं आहे. ” अशी प्रतिक्रिया दिली आहे.