देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी? पहा कोणत्या नोट होणार बंद?.

 

नोटबंदी हा शब्दही कानावर पडल्यास अंगाला घाम फुटतो. होय हे खरे आहे कारण लवकरच नोटबंदी होणार असून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आता 2 हजार रुपयांची नोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी संसदेच्या सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला आहे.

पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर या तारखेला जमा होणार 19 वा हप्ता

संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने अधिवेशनात खा. सुशील कुमार मोदी म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून बाजारात गुलाबी रंगाच्या 2 हजार रुपयांच्या नोटा दुर्मिळ झाल्या आहेत. एटीएममधूनही 2 हजार रुपयांची नोट मिळत नाही, त्यामुळे 2 हजार रुपयांची नोट आता वैध नाही अशी अफवा पसरवली जात आहे. सरकारने या संदर्भात भूमिका घ्यावी.

2016 मध्ये झाली होती नोटबंदी
8 नोव्हेंबर 2016 हा दिवस आठवला तर आजही घाम फुटतो. कारण आजच्या दिवशी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. या घोषणेत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अवैध घोषीत करत चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. या नोटांच्या बदल्यात सरकारने 500 च्या नविन आणि 2000 हजार रुपयांची नोट बाजारात चलनात आणली.

पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर या तारखेला जमा होणार 19 वा हप्ता

सुशील कुमार मोदींनी काय केला दावा ?
खा. सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 हजार रुपायांच्या नोटेची छपाई बंद केली आहे. तसेच 2 हजारांच्या नकली नोटाही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर 2 हजाराच्या नोटांचा साठा केला आहे. त्याचा वापर केवळ अवैध धंद्यात होत आहे. काही ठिकाणी 2 हजारांच्या नोटा ब्लँकने विकल्या जात आहेत.

2 हजारांच्या नोटेची छपाई कधीपासून बंद?
2017-18 या वर्षात 2 हजार रुपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात होत्या. त्यावेळी 33 हजार 630 लाख नोटा बाजारात होत्या. ज्याचे मूल्य जवळपास 6.72 लाख करोड इतके होते. 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभत माहिती देताना सांगितले होते की, गेल्या दोन वर्षात 2 हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही. रिझर्व्ह बँकेनेही 2019 पासून 2000 रुपयांची नोटेची छपाई झाली नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळेच सध्या बाजारात 2 हजार रुपायांच्या नोटेचा मोठा तुटवडा भासत आहे.

Leave a Comment